बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) व त्याची मराठमोळी बायको शिबानी दांडेकर आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तीन वर्षांपूर्वी लग्न करणारे शिबानी व फरहान आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत, असं म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांवर फरहान अख्तरची सावत्र आई ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फरहान अख्तर आज ५१ वर्षांचा झाला. दोन मुलींचा बाबा असलेला फरहान लवकरच शिबानीबरोबर पहिल्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. शबाना आझमी यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. या अफवांमध्ये “कोणतेही तथ्य नाही,” असं शबाना यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – २० वर्षांची साथ अन् ३ मुलं, प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचा १६ वर्षांचा संसार मोडला?

फरहान अख्तरने फेब्रुवारी २०२२ मध्ये शिबानी दांडेकरशी एका खासगी समारंभात लग्न केलं होतं. फरहानचं हे दुसरं लग्न होतं. त्याआधी त्याचं लग्न अधुना भाबानीशी झालं होतं. या जोडप्याने २००० साली लग्न केलं होतं, ते १७ वर्षांच्या संसारानंतर २०१७ मध्ये विभक्त झाले. फरहान व शिबानीला शाक्य व अकिरा या दोन मुली आहेत. अधुनापासून घटस्फोट घेतल्यावर फरहानच्या आयुष्यात शिबानी आली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं. आता हे दोघेही आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र शबाना आझमी यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

हेही वाचा – Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी

फरहान अख्तरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच ‘120 बहादूर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धात प्राण गमावणाऱ्या १२० सैनिकांवर आधारित राह सिनेमा आहे. या व्यतिरिक्त फरहान रणवीर सिंहबरोबर ‘डॉन ३’ मध्ये तर कियारा अडवाणीबरोबर ‘किट्टी’ सिनेमात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi reacts on farhan akhtar shibani dandekar pregnancy news hrc