मंडी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार व बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्यावर गुरुवारी (६ जून रोजी) चंदीगढ विमानळावर हल्ला झाला. कुलविंदर कौर नावाच्या एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कंगना रणौत यांना कानशिलात लगावली. या घटनेवर राजकीय नेते व अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. आता दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

शबाना आझमी यांनी कंगना रणौत यांची बाजू घेतली आहे, त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला होणं ही चुकीची गोष्ट असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. “माझ्या मनात कंगना रणौतबद्दल प्रेम नाही. पण तिच्या कानशिलात लगावण्याची घटना मी साजरी करू शकत नाही. या घटनेनंतर खुश झालेल्या लोकांच्या गर्दीत मी सामील होऊ शकत नाही. अशा रितीने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी कोणीही सुरक्षित राहणार नाही,” अशी पोस्ट एक्सवर शबाना आझमी यांनी केली आहे.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Novel sports Competition Rita Bullwinkle
रेंगाळत ठेवणारी मनलढाई…
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
friend request, Facebook , Complainant woman,
तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स

Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा

कंगना रणौत व शबाना आझमी यांचे पती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यामध्ये वाद सुरू आहे. या दोघांचा मानहानीचा एक खटला कोर्टात सुरू आहे. यासंदर्भात अनेकदा जावेद अख्तर व कंगना रणौत प्रतिक्रिया देत असतात. अशातच कंगनाबरोबर घडलेल्या या घटनेनंतर शबाना आझमींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

“शेतकरी मातेच्या लेकीने गाल लाल केल्यावर…”, कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला खेळाडूचा पाठिंबा

घटनेनंतर काय म्हणाल्या होत्या कंगना रणौत?

“मला अनेकजण फोन करत आहेत. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान चंदीगढमध्ये ही घटना घडली. मी सुरक्षा तपासणीदरम्यान जात असताना दुसऱ्या केबिनमध्ये सीआयएसएफची एक महिला कर्मचारी होती. त्यांनी माझ्या जाण्याची वाट पाहिली, मी पुढे गेल्यावर त्यांनी जवळ येत मला कानशिलात लगावली. मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं म्हणाल्या. पंजाबमध्ये दहशतवाद व उग्रवाद वाढत असून तो कसा रोखायचा?” असा प्रश्न कंगना यांनी व्हिडीओ शेअर करत विचारला.

कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला नोकरी देणार, बॉलीवूड गायक विशाल ददलानीची ऑफर

कंगना यांना मारल्यावर कुलविंदर कौर म्हणाली होती…

या घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हिडीओत कुलविंदर म्हणते की, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी म्हटलं होतं की त्या महिला १०० रुपयांसाठी आंदोलन करत होत्या. कंगना तिथे बसू शकल्या असत्या का? कंगना यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं होतं, तेव्हा आपली आई तिथे आंदोलन करत होती, असं तिने म्हटलं.

Story img Loader