दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. त्यातील काही अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाते चांगले असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी राजेश खन्ना आणि संजीव कुमार यांच्याबरोबरचे काही मजेदार किस्से सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आझमी यांनी सांगितली संजीव कुमार यांची आठवण; म्हणाल्या, “सगळ्यात भयानक…”

शबाना आझमी यांनी नुकतीच फेय डिसूजाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संजीव कुमार यांच्याबरोबरचा एका संवादाची आठवण सांगितली. त्यांनी म्हटले, “संजीव कुमार हे खूप विनोदी होते; मात्र ते तितकेच निर्दयी होते. सगळ्यात भयानक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. एकदा मी माझी नखं कापत होते, तेव्हा त्यांनी मला विचारले की, तू काय करत आहेस. मी त्यांना म्हटले, “मी एक प्रामाणिक आणि कामाप्रति समर्पित अभिनेत्री आहे. मला जी भूमिका मिळाली आहे, त्या भूमिकेसाठी मोठी नखं असणं गरजेचं नाही. त्यामुळे मी नखं कापत आहे. मला एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवायचं असेल किंवा बारीक व्हायचं असेल, तर तेदेखील मी करू शकते, हे तुम्ही पाहिले आहे.” त्यावर संजीव कुमार मला म्हणाले, “याच्याबरोबरच तुझ्याकडे प्रतिभा असती, तर बरं झालं असतं”, असं म्हणत मोठ्याने हसत निघून गेले. त्यांना खूप आनंद वाटत होता,” असे शबाना आझमी यांनी हसत सांगितले.

“तुला का नेहमी राजा हरिश्चंद्र बनायचे असते?”

राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना त्यांनी म्हटले, “मी आणि राजेश खन्ना आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. काही गोष्टींमुळे त्यांना मी आवडायचे. एक दिवस ते लंगडत सेटवर आले. ती दुखापत त्यांनी स्वत:च करून घेतली होती. एक पत्रकारानं कुतूहलानं त्यांना त्यांच्या त्या दुखापतीबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी सांगितलं की, काल घोडेस्वारीचा सीन शूट करताना मला लागलं आहे. मी लगेच म्हटले की, पण तुम्ही काल दिवसभर माझ्याबरोबर शूट करीत होता. घोडेस्वारीचा सीन कधी शूट केला? मी असे बोलत असताना त्यांनी मला टेबलाखालून माझ्या पायावर धक्का दिला. पत्रकार गेल्यानंतर मला म्हटले, तुला का नेहमी राजा हरिश्चंद्र बनायचे असते. मी गोंधळले आणि त्यांना विचारले की, त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांची लुंगी त्यांच्या पायाभोवती गुंडाळली गेली होती. त्यामुळे ते पायऱ्यांवरून खाली पडले. पुढे त्यांनी म्हटले की, ती पत्रकार विचार करते की, मोठा अभिनेता आहे. मी तिला खरंच हे सांगायला पाहिजे?”

हेही वाचा: आजीच्या विरोधामुळे ‘या’ अभिनेत्रीने देव आनंद यांना दिलेला नकार, नंतर आयुष्यभर राहिलेला पश्चाताप

दरम्यान, शबाना आझमी यांनी संजीव कुमार यांच्याबरोबर ‘राम तेरे कितने नाम’, ‘स्वर्ग नरक’, ‘देवता’ व अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजेश खन्ना यांच्याबरोबर त्यांनी ‘अवतार’, ‘नसिहत’, ‘थोडीसी बेवफाई’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi recalled a hilarious interaction with sanjeev kumar says he was very funny but very unkind he used to say the most horrible things nsp