‘द केरला स्टोरी’वरून देशभरात चांगलाच वाद होत आहे, वाद सुरू असूनही चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. रविवारी चेन्नईसह तामिळनाडूतील अनेक मल्टिप्लेक्सने ‘द केरला स्टोरी’चे स्क्रिनिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच राजकीय संघटनाही या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेत आहेत. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘The Kerala Story’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

“जे लोक ‘द केरला स्टोरी’वर बंदी घालण्याची भाषा करतात, ते आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर बंदी घालू इच्छित होते, त्यांच्याइतकेच चुकीचे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपट पास केल्यानंतर कोणालाही अतिरिक्त घटनात्मक अधिकार बनण्याचा अधिकार नाही,” असं ट्वीट करत शबाना आझमी यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना फटकारलं आहे.

दरम्यान, चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काहींनी कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाने त्यावर बंदी घालण्यास नकार दिला. त्यानंतर या चित्रपटाचं समर्थन करणारे व विरोध करणारे असे दोन गट दिसत आहेत. काहींच्या मते, चित्रपटात अतिशयोक्ती दाखवण्यात आली आहे आणि चित्रपट समाजाला भडकवण्याचे काम करतो. तर, काहींच्या मते हा चित्रपट देशातील महिलांसाठी महत्त्वाचा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi slams people who asking to ban the kerala story hrc