बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत जे विभक्त झाले असले तरीही एकमेकांशी त्यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यापैकीच एक म्हणजे जावेद अख्तर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी. १९७८ मध्ये जावेद आणि हनी विभक्त झाले. त्यानंतर जावेद आणि शबाना आझमी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी १९८४ मध्ये लग्न केलं. तर आता शबाना आझमी यांनी त्यांचं फरहान आणि झोया अख्तर यांच्याशी कसं नातं आहे हे सांगितलं आहे.
हनी इराणी आणि जावेद अख्तर विभक्त झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं. शबाना यांच्याशी लग्न झाल्यानंतरही शबाना, जावेद, हनी यांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध होते. फरहान आणि झोया दोघंही जावेद अख्तर आणि हनी इराणी यांची मुलं आहेत. आता त्या दोघांशी शबाना आझमी यांचं नातं कसं आहे, हे त्यांनी ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तर हे सांगत असताना त्यांनी हनी इराणी यांचे आभारही मानतो.
आणखी वाचा : “मला त्या गोष्टीची लाज वाटते…,” मनोज बाजपेयी यांचा लेकीच्या हिंदी बोलण्याबाबत मोठा खुलासा, म्हणाले…
शबाना आजमी म्हणाल्या, “आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. आमच्यात विश्वासाचं आणि मैत्रीचं नातं आहे. फारहान आणि झोया माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते दोघेही माझा खूप आदर करतात आणि हे सगळं शक्य झालं ते त्यांची आई हनी इराणीमुळे. त्यामुळे फरहान, झोया यांचं माझ्याशी जे नातं आहे त्या सगळ्याचं श्रेय तिला जातं. ती स्वभावाने खूप चांगली आहे आणि म्हणूनच तिने तिच्या मुलांना माझ्याशी मैत्री करू दिली.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी या दोन्ही मुलांची खूप चांगलं नातं निर्माण करू शकले याबद्दल मी हनीची आभारी आहे. फक्त दोन्ही मुलांचीच नाही तर हनी आणि माझ्यातही खूप चांगलं नातं आहे. पण मी कधीही तिच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत नाही. तिला ज्या गोष्टींवर बोललेलं आवडत नाही त्या गोष्टींवर मी बोलत नाही.” आता शबाना आझमी यांचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.