अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान व अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला ही माहिती दिली आहे. त्यांनी गुटखा कंपन्यांसाठी केलेल्या जाहिरातींच्या संदर्भात अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या वकिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाला माहिती दिली की, सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ही याचिका तातडीने फेटाळण्यात यावी. युक्तिवादानंतर खंडपीठाने पुढील सुनावणीसाठी ९ मे २०२४ ही तारीख निश्चित केली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने आधी केंद्र सरकारने याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधित्वावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. मोठे पुरस्कार मिळूनही गुटखा कंपन्यांच्या जाहिराती करणारे अभिनेते आणि मान्यवर यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असं त्यांचं म्हणणं होतं.
अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर असताना केलं लग्न, तब्बल ३० वर्षे सहन केला पतीचा अत्याचार अन् २०१५ मध्ये…
याचिकाकर्त्याने सुनावणीदरम्यान असंही सांगितलं की, २२ ऑक्टोबर रोजी या अभिनेत्यांच्या वतीने लोकांनी सरकारसमोर आपले म्हणणे मांडले होते. मात्र, तरीही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती, त्यानंतर शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी न्यायालयाला सांगितलं की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगणला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.