शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७२ कोटींची छप्परफाड कमाई केली. संपूर्ण भारतातच नव्हेचांगला तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा- “मी नास्तिक आहे पण…” सामाजिक वातावरण गढूळ होण्याविषयीचं अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत

दरम्यान जवान चित्रपटाला मिळणाऱ्या यशानंतर शाहरुख खानने पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत चित्रपटातील संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी शाहरुखने दीपिकाशी संबधित एक किस्सा सांगितला आहे. शाहरुख म्हणाला, दीपिकाला वाटले की, ‘ती एक छोटीशी भूमिका करायला आले आहे. पण आम्ही तिला मूर्ख बनवले आणि तिच्याबरोबर संपूर्ण चित्रपट शूट केला. यासाठी दीपिकाचे धन्यवाद. प्रेक्षकांसाठी अशा प्रकारचा चित्रपट बनवताना मला खूप आनंद झाला.”

‘मी हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होते. यावेळी अॅटली आणि शाहरुख तिथे आले आणि त्यांनी मला संपूर्ण चित्रपटाची कथा सांगितली. चित्रपटात माझ्या पात्र केवढं आहे याने काही फरक पडत नाही. मी फक्त या व्यक्तिरेखेच्या प्रभावाचा विचार करत होते.

हेही वाचा- Video : शाहरुख खानचा जबरा फॅन; व्हेंटिलेटरवर असणारा चाहता ‘जवान’ पाहण्यासाठी पोहचला चित्रपटगृहात

चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७२ कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीबरोबर तमिळ आणि तेलगू भाषेतही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत जवानने अनेक रेकॉर्ड मोडले आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ३४५.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.