सलमान खानचा बहुचर्चित ‘टायगर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘टायगर ३’मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबरच कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. आता चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video दारु, डान्स, गाणी अन्…; शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीतला इनसाईड व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या ‘टायगर 3’मध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे, या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त आणखी एक अभिनेता कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हृतिक रोशन आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ मध्ये शाहरुख आणि सलमान कॅमिओ करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. तसेच ‘वॉर २’मध्ये साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरही झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या ‘वॉर २’ चे दिग्दर्शन आयान मुखर्जी करणार आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा-पंकज त्रिपाठींनी ‘अटल’ चित्रपटाचे शुटिंग करताना दोन महिने खाल्ला फक्त ‘हा’ पदार्थ; म्हणाले, “मेंदू आणि शरीर यांच्यात…”

‘टायगर ३’बद्दल बोलायचं झालं तर दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबर २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला हा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तामिळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan and hritik roshan will also appear in a cameo in salman khan most awaited film tiger 3 dpj