बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहानाचा ‘द आर्चीज’ चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुहानाला दुसऱ्या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुख-सुहाना एकत्र दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखचा ‘पठाण’ हा १००० कोटी रुपये कमावणार पहिला चित्रपट ठरला आहे. त्यामुळे त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटाकडून चाहत्यांना अधिक अपेक्षा आहेत. या दोन चित्रपटानंतर शाहरुखने आपल्या लेकीला मोठ्या पडद्यावर झळकवण्यासाठी विशेष तयारी केल्याची माहिती मिळत आहे.

आणखी वाचा – “माय हँडसम…”, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त मलायका अरोराने शेअर केलेली रोमॅंटिक पोस्ट चर्चेत

‘पठाण’ चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदबरोबर शाहरुख एक चित्रपट करणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्सद्वारे या चित्रपटाची केली जाणार आहे. ज्या चित्रपटात सुहाना मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. पण या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार, हे मात्र निश्चित झालेले नाही.

आणखी वाचा – ठरलं! हृतिक रोशनचा बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, अभिनेत्याने शेअर केली पहिली झलक

आणखी वाचा – नवाजुद्दीन सिद्दिकीने कंगना रणौतचं केलं कौतुक, इच्छा व्यक्त करत म्हणाला, “तिच्याबरोबर…”

तसेच शाहरुख आणि सुहानाच्या या चित्रपटाचे नाव देखील ठरलेले नाही. येत्या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल असे म्हटले जात आहे.

दरम्यान शाहरुख खान सध्या ‘डंकी’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर सिद्धार्थ आनंद ‘फायटर’ चित्रपटाचे काम करत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan and suhana khan first time will collaborate professionally in this movie pps