अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. शाहरुख खानच्या या बहुचर्चित चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ‘पठाण’ प्रमाणे शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली. नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड आपल्या नावे केले. अशा भरघोस यशाचा आनंद अजूनही कलाकार मंडळी घेताना दिसत आहेत. अशातच दिग्दर्शक अ‍ॅटलीने नव्या प्रोजेक्टची हिंट दिली आहे; ज्यामध्ये थलपती विजय व शाहरुख खान झळकणार आहेत. यामुळे आता चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सई कोणाची निवड करणार सागर की सावनीची? पाहा मालिकेचा नवा प्रोमो

CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
वक्फ मंडळ कायदा नरेंद्र मोदीच बदलणार; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा विश्वास; राहुल गांधींवर टीका
Kalwa-Mumbra Constituency,
कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
maharashtra vidhan sabha election 2024 chief ministers decision after the election to avoid displeasure in mahayuti
महायुतीत नाराजी टाळण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर?
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान

लोकप्रिय तमिळ टीव्ही प्रेझेंटर आणि यूट्युबर गोपीनाथबरोबर संवाद साधताना अ‍ॅटलीने नव्या प्रोजेक्टबाबत खुलासा केला. तो म्हणाला, “माझ्या वाढदिवसाच्या पार्टीचं आमंत्रण देण्यासाठी मी विजयला फोन केला होता. त्यावेळेस विजयने पार्टीला उपस्थित राहण्याची खात्री दिली. जेव्हा विजय पार्टीत आला तेव्हा शाहरुख व त्याच्यामध्ये बातचित झाली. त्यानंतर दोघांनी मला बोलावलं. मग शाहरुख मला म्हणाला की, जर तू दोन हिरो असलेला चित्रपट बनवण्याचा विचार करत असशील तर आम्ही दोघं तयार आहोत. यावर विजयनेही होकार दिला आणि म्हणाला, ‘अमा पा’. त्यामुळे आता मी यावर काम करत आहे. हा माझा आगामी चित्रपट असू शकतो. या चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी मी खूप मेहनत घेत आहे. आता बघू.”

हेही वाचा – “…प्रियाला हाण हाण हाणा”, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनने सायलीसाठी घेतला मजेशीर उखाणा

दरम्यान, अ‍ॅटलीची दिग्दर्शन क्षेत्रातील कामगिरी खूप दमदार आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये ‘राजा रानी’, ‘थेरी’, ‘मेर्सल’, ‘बिगिल’ आणि आता ‘जवान’ सामील झाला आहे.