‘पुष्पा : द राईज’ या सिनेमातील ‘ऊ अंटावा’ हे गाणं अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर चित्रित करण्यात आलं होतं. या डान्समधील तिच्या स्टेप्सने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. या गाण्यात अल्लू अर्जुनही होता आणि त्याची व समांथाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. २०२१ मध्ये आलेल्या या आयटम साँगने प्रेक्षकांसह बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्डमध्ये शाहरुख खान आणि विकी कौशल यांनी या गाण्यावर डान्स केला आहे. गाण्याची रील इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत समांथाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा (आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार) अबुधाबीमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन शाहरुख खान आणि विकी कौशल यांनी केले. या जोडीने सोहळ्यात धम्माल उडवून दिली असून, त्यांचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा…Video : ‘ॲनिमल’साठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला अन् बॉबी देओलने पत्नीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल

शाहरुख आणि विकीचा ‘ऊ अंटावा’वर धमाल परफॉर्मन्स

‘आयफा २०२४’मधील इव्हेंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात शाहरुख ‘ऊ अंटावा’ गाण्यावर थिरकताना दिसतोय. एका व्हिडीओमध्ये शाहरुख समांथाच्या भूमिकेत दिसतो, तर विकीने ‘पुष्पा : द राइज’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा अवतार घेतला आहे. शाहरुखने विकीला पकडून समांथाने जशा प्रसिद्ध हूक स्टेप्स केल्या होत्या, तशाच स्टेप्स करत परफॉर्मन्स सादर केला.

समांथाची प्रतिक्रिया

समांथाने सोशल मीडियावर या परफॉर्मन्सवर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख आणि विकीच्या ‘ऊ अंटावा’ डान्सचे व्हिडीओ पाहून ती थक्क झाली. समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्याचा एक रील शेअर करत लिहिलं, “माझ्या आयुष्यात हे कधी होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.”

समांथाने सोशल इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि विकी कौशलच्या ‘ऊ अंटावा’ परफॉर्मन्सवर प्रतिक्रिया दिली आहे. (Photo Credit – Samantha Ruth Prabhu/Instagram)

हेही वाचा…Video : दिलजीत दोसांझने पाकिस्तानी चाहतीला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दिली भेटवस्तू; म्हणाला, “या सीमा राजकारण्यांनी…”

दरम्यान, समांथा लवकरच ‘सिटाडेल : हनी बनी’ या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिचा ‘बंगाराम’ सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, तुंबाडचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या ‘रक्तब्रम्हांड’ या वेब सीरिजमध्येही समांथा झळकणार आहे.