Shah Rukh Khan New Announcement : २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी सर्वार्थाने खास ठरलं. त्याचे ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ असे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. मात्र, २०२४ मध्ये शाहरुख रुपेरी पडद्यापासून दूर होता. सध्या अभिनेत्याचे सगळे चाहते त्याला सिल्व्हर स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मात्र, अशातच शाहरुखने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. ही आनंदाची बातमी आहे शाहरुखचा मोठा लेक आर्यन संदर्भातली…आता लेकाचा चित्रपट म्हटल्यावर शाहरुख सुद्धा या सिनेमाचा नक्कीच अविभाज्य भाग असेल यात शंका नाही. याबद्दल अभिनेत्याने नेमकी काय घोषणा केलीये जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्यन खानच्या या नव्या कलाकृतीबद्दल माहिती आहे. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट यांच्या भागिदारीतून २०२५ मध्ये एक बॉलीवूड सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजची निर्मिती गौरी खान करणार आहे. तर, या सीरिजच्या निमित्ताने आर्यन खान क्रिएटर आणि दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या मेगा प्रोजेक्टची घोषणा या आठवड्यात लॉस एंजेलिसमध्ये एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली होती.

हेही वाचा : प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने कमावले ‘इतके’ कोटी! पठाण आणि टायगरला सुद्धा टाकलं मागे

शाहरुख याबद्दल सांगतो, “आम्ही एक नवीन सीरिज Netflix बरोबर सादर करण्यास उत्सुक आहोत. ही सिनेमॅटिक सीरिज सिनेजगतात अभुतपूर्व अनुभूती देणारी ठरेल. आर्यन आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्यावतीने याची निर्मिती करण्यात आली आहे. ही सीरिज सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारी ठरेलं.”

सीरिजची अधिकृत घोषणा करण्याबरोबरच शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनला एक सल्लाही दिला आहे. तो म्हणाला, “आर्यन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आता तयार हो…हे सुद्धा लक्षात ठेव की, मनोरंजनासारखा दुसरा चांगला व्यवसाय कोणताच नाही.” या मालिकेची निर्मिती आर्यनची आई व शाहरुखची पत्नी गौरी खानने केली आहे.

हेही वाचा : “प्रिय टीव्ही तुझ्यामुळे…”, Bigg Boss फेम अभिनेत्रीचं टेलिव्हिजनसाठी भावुक पत्र! ‘या’ मालिकेत साकारतेय खलनायिका

दरम्यान, २०२५ मध्ये आर्यनची ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखने या पोस्टद्वारे आपल्या मुलाला त्याच्या भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan announces son aryan khan debut netflix bollywood as director and produce by wife gauri sva 00