Shah Rukh Khan : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेविषयी वृत्त समोर येत आहेत. शाहरुख डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच शाहरुख खान काल प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला. यावेळी अभिनेत्याच्या जबरदस्त लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळेच सिद्धार्थ आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शाहरुखचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सलाम नमस्ते’, ‘बचना ऐ हसीनों’, ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ यांसारख्या अनेक चित्रपटाची निर्माती, दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद केलं आहे. गेल्या वर्षी त्याने शाहरुख खानबरोबर ( Shah Rukh Khan ) अ‍ॅक्शन-थ्रिलर ‘पठाण’ चित्रपट केला. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या ‘पठाण’ चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं होतं. काल, ३१ जुलैला सिद्धार्थने ४६वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसासाठी खास शाहरुख खानने उपस्थित लावली होती.

हेही वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! तीन वर्षांनंतर Squid Game 2 वेब सीरिज प्रेक्षकांच्या येणार भेटीस, प्रदर्शनाची तारीख…

Shah Rukh Khan (Photo Credit – Indian Express)

मुंबईत वांद्रे येथे सिद्धार्थ आनंदची वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी हजर होते. पण पार्टीतील शाहरुख खानच्या जबरदस्त लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शाहरुखचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता आलिशान गाडीत बसताना दिसत आहे. यावेळी बादशाह ब्लॅक टी-शर्ट, डेनिम जॅकेट आणि ग्रे रंगाच्या कार्गो पँटमध्ये पाहायला मिळत आहे. शाहरुखचा ( Shah Rukh Khan ) हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यामुळे या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होतं आहे.

हेही वाचा – Video: अमेरिकेहून सुट्टी एन्जॉय करून लाडक्या लेकीसह मुंबईत परतील ऐश्वर्या राय-बच्चन, नेटकरी म्हणाले, “ही शाळेत जात नाही का?”

हेही वाचा – अनंत अंबानींच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेला मराठी अभिनेता झळकणार आता लोकप्रिय मालिकेत, म्हणाला, “खूप दिवसांनी पुन्हा…”

शाहरुख खानचा आगामी चित्रपट जाणून घ्या…

दरम्यान, शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी त्याचे तीन चित्रपट म्हणजेच ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ प्रदर्शित झाले होते. या तिन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता शाहरुख ‘द किंग’ चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात त्याची लेक सुहाना खान पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुहाना पहिल्यांदाच शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ‘द किंग’ चित्रपटात शाहरुख, सुहानाबरोबर अभिषेक बच्चन देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुजॉय घोष सांभाळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan attending the birthday celebration of his friend and director siddharth anand pps