Happy Birthday Shah Rukh Khan : ९० च्या दशकापासून बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या बादशहाचा आज ५९ वा वाढदिवस. शाहरुखने आपल्या अभिनयातील करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. यानंतर आपलं नशीब आजमवण्यासाठी आणि गौरीवरच्या प्रेमापोटी हा किंग खान मुंबईत आला. ‘दीवाना’ चित्रपटातून पदार्पण केलेला शाहरुख बघता-बघता स्टार झाला. आज वाढदिवसानिमित्त किंग खानवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार शाहरुखचे ( Shah Rukh Khan ) ‘जबरा फॅन्स’ आहेत. आज किंग खानच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते किरण माने यांनी सविस्तर पोस्ट शेअर करत शाहरुखच्या समाजकार्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये नेमकं काय-काय लिहिलंय जाणून घेऊयात…

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा : Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…

शाहरुख खानसाठी ( Shah Rukh Khan ) किरण मानेंची पोस्ट

ॲसिड अटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं, त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं…
ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय!

आपल्या आई-वडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये त्याने लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वॉर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत मोठी आर्थिक मदत करत असतो.

२०१२ मध्ये त्याने देशभरातली बारा खेडेगांवं दत्तक घेतली. तिथे स्वखर्चाने वीज, पाणी, शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं त्याने काम केलं. अजूनही तिथे नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय!

भारतातील झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांची इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या ‘मेक अ विश फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो. महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसाठी त्याने जगभरात कॉन्सर्ट करुन कोट्यवधी रुपये उभे केले. तर इंडियन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रूपये दिले.

करोना काळात त्याने स्वत:चं चार मजली ऑफिस बीएमसीला दिलं. लॉकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटुंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २ हजार लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगाल येथील अतिशय दुर्गम खेड्या-पाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवले.

शाहरुखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू? मी लिहित जाईन पण, तुम्ही वाचून वाचून थकून जाल. त्याच्याविषयी कुणी कितीही अफवा पसरूद्यात. कुणी म्हणेल पाकिस्तानला त्याने हे दिलं आणि ते दिलं. सगळ्या थापा आहेत हो… अहो, अन्नदान करताना सुद्धा धर्म बघून करणार्‍या त्या दळभद्र्या जमाती… त्यांना ‘द ग्रेट शाहरूख खान’ कसा झेपणार? त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरूखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवलाय हे सत्य लपणार नाही! त्याने केलेल्या समाजपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या युनेस्को अवॉर्ड्स मध्ये स्पेशल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय. तो फक्त अभिनयातला बादशाह नाही, तर ‘माणूस’ म्हणून सुद्धा किंग आहे! सलाम शाहरूख खान… कडकडीत सलाम! कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटेल. आज तू साठाव्या वर्षात पाऊल ठेवतोयस. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा! ( Shah Rukh Khan )

हेही वाचा : Bhool Bhulaiyaa 3 ठरला कार्तिक आर्यनचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल

दरम्यान, किरण मानेंनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. आज शाहरुखच्या ( Shah Rukh Khan ) वाढदिवसानिमित्त ‘मन्नत’ बंगल्यावर खास पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

Story img Loader