अभिनय आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुख खानचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेकदा त्याचे चाहते ‘मन्नत’बाहेर गर्दीदेखील करताना दिसतात. शाहरुख खानही त्याच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. असंच काहीसं आतादेखील घडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला त्याच्या एका चाहत्याने भेटण्यासाठी विनंती केली होती. सुधीर कोठारी असं त्या चाहत्याचं नाव असून माझ्यासह इतरही काही चाहत्यांना शाहरुखला भेटण्याची इच्छा असल्याचे त्याने व्यक्त केलं होतं. आपल्या चाहत्यांना कधीच निराश न करणाऱ्या शाहरुखने त्याच्या या जबरा फॅन्सला भेटण्यासाठी चक्क फाइव्ह स्टार हॉटेलमधील दोन रूम बुक केल्या होत्या.

हेही वाचा >> “नैराश्याबद्दल बोलण्यासाठी मला कंपनीने पैसे…”, दीपिका पदुकोणने मानसिक आजाराबाबत केला खुलासा

सुधीर कोठारीने सांगितल्याप्रमाणे, ‘शाहरुख खान फॅन क्लब’मधील २० चाहत्यांना ही संधी मिळाली. चेन्नई जवळील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये या सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं. एवढचं नाही तर हॉटेलमध्ये त्यांच्या इच्छेनुसार त्यांना खाण्यासाठी ऑर्डरही देण्यास सांगण्यात आलं होतं. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर शाहरुख त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी हॉटेलवर गेला. परंतु, सगळ्यांना एकत्र न भेटता त्याने प्रत्येक चाहत्याला पुरेसा वेळही दिला, असंही सुधीर म्हणाला. शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांच्या भेटीचे हे फोटो ‘शाहरुख खान फॅन क्लब’ या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा >> “तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो?”, नीतू कपूर म्हणतात “एक कोटी…”

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावरुन तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटांची मेजवानी तो चाहत्यांसाठी घेऊन येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan booked rooms in five star hotel to meet and greet with his fans photos viral kak