अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या ‘भक्षक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान आणि शाहरुख यांनी केली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर शाहरुख खानने फोन केला होता, असा खुलासा भूमीने केला आहे.

‘भक्षक’ चित्रपटाचा ट्रेलर ३१ जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे किस्से सांगताना न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत, भूमीने खुलासा केला की चित्रीकरण संपल्यानंतर तिला शाहरुख खानचा फोन आला होता आणि शाहरुखने चित्रपट केल्याबद्दल भूमीचे आभार मानले.

हेही वाचा… कंगना रणौतने संदीप रेड्डी वांगासह काम करण्यास दिला नकार; म्हणाली, “मग तुमचेही चित्रपट फ्लाॅप…”

भूमी म्हणाली, “ज्या दिवशी चित्रपटाचा शेवटचा दिवस होता. मला आठवतंय मी जेवत होते आणि डोक्यात हेच सुरू होतं की आता चित्रपट पूर्ण झाला आहे आणि या चित्रपटासाठी एक गेट-टूगेदर पार्टीसुद्धा होणार होती त्यासाठी मी उत्सुक होते. आम्ही लखनऊमध्ये होतो आणि तेव्हाच मला शाहरुख सरांचा फोन आला. मी हा चित्रपट केल्याबद्दल त्यांनी माझे आभार मानले आणि मला असं वाटलं की शाहरुख सर हे एक एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांनी माझे आभार मानायची काहीच गरज नव्हती.”

भूमीला शाहरुख खानबरोबर काम करायचे आहे का? असे विचारले असता भूमी म्हणाली, “लहानपणापासूनच हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. त्यामुळे मला खरोखर आशा आहे की मला त्यांच्यासह काम करायची संधी मिळेल.”

‘भक्षक’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्साह पाहता शाहरुख खाननेही टीमचे कौतुक केले. एक्सवर पोस्ट शेअर करत शाहरुखने लिहिलं, “‘भक्षक’ चित्रपटासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. या चित्रपटाची सगळी स्टारकास्ट उत्तम आहे आणि हा एक चित्रपट ठरणार आहे.”

हेही वाचा… ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष

‘भक्षक’ हा चित्रपट मुझफ्फरपूर महिला शेल्टर केसवर आधारित आहे ज्यामध्ये ब्रजेश ठाकूर आणि इतर ११ जणांना अनेक अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या चित्रपटात भूमी पेडणेकरसह संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader