Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. अर्थात किंग खानचं स्टारडम पाहता तो त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तगडं मानधन आकारत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच गेल्या काही दिवसांपासून शाहरुख एका लग्नात डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान दिल्लीतल्या एका लग्नसोहळ्यात ‘झुमे जो पठाण’ गाण्यावर डान्स करत असल्याचे असंख्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडच्या काही दिवसांत मोठ्या धुमधडाक्यात लग्न करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकदा लग्नाची शोभा वाढवण्यासाठी अशा बड्या सेलिब्रिटींना त्यांनी मागितलेलं मानधन देऊन कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी निमंत्रित केलं जातं.

हेही वाचा : ३ वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री जुळ्या मुलांची झाली आई, एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर

लग्नात परफॉर्म करण्यासाठी कलाकार थोडथोडकं नाहीतर कोट्यवधींच्या घरात मानधन घेतात. अशातच शाहरुख खानचा डान्स आणि उत्साह पाहता त्याने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी नेमके किती कोटी आकारले असतील याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) या लग्न सोहळ्यात फिल्मी डायलॉग बोलून नववधूचं कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नवरीबाईच्या मेकअप आर्टिस्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शाहरुखने आमच्या लग्नात सुद्धा अशाप्रकारे यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर, काही लोकांनी या मेकअप आर्टिस्टला कमेंट्समध्ये शाहरुखने या लग्नात डान्स करण्यासाठी किती रुपये मानधन घेतलं याबद्दल विचारपूस केली आहे.

हेही वाचा : प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”

नववधूच्या मेकअप आर्टिस्टने, नेटकऱ्यांनी शाहरुखचं मानधन विचारताच “तो त्यांचा फॅमिली फ्रेंड आहे” असं उत्तर दिलं आहे. या व्हिडीओला काही दिवसांतच ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा : Comedian Sunil Pal: बेरोजगारांनी केलं कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण; खंडणीच्या पैशांतून सोनं घेतलं, २० हजार देऊन पाल यांना सोडलं

Shah Rukh Khan

दरम्यान, आता शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘किंग’ या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमासाठी काम करत आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यामध्ये किंग खानची लेक सुहाना त्याच्याबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding make up artist reveals sva 00