बॉलीवूडच्या ‘किंग खान’ शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर २५ एप्रिलला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. ‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत. शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पठाणप्रमाणे जवान चित्रपटही ओटीटीवर लवकर प्रदर्शित करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.

हेही वाचा- “आर्यनच्या क्लोदिंग ब्रँडचे जॅकेट एक ते दोन हजारपर्यंत बनवा”; चाहत्याच्या मागणीवर शाहरुखचे भन्नाट उत्तर, म्हणाला…

unsafe migration methods use by indian to to enter in america
अमृतकाळाचा डंका खरा की अमेरिकी डंकी?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Pune Municipal Corporation is losing revenue due to income tax defaulters worth crores of rupees Pune print news
बड्यांची थकबाकी, सामान्यांना भुर्दंड, नक्की काय आहे प्रकार! कोट्यवधींचा कर थकल्याचा मूलभूत सुविधानिर्मितीला फटका
loksatta Analysis Tiger body part Trafficking in marathi
वाघनखे, हाडे, रक्त, चरबी, जननेंद्रिये… वाघांच्या अवयवांची तस्करी का होते? कथित फायदे कोणते? अंदाजे किंमत किती?
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
Will Meghe Medical Group be taken over by Adani
मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?

एका चाहत्याने ट्वीट करत शाहरुखला जवान चित्रपट ओटीटीवर लवकर प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. चाहत्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे, “शाहरुख भाई १००-२०० रुपये जास्त घ्या, पण उद्याच जवान चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करा.” चाहत्याच्या या मागणीला शाहरुखने मजेशीर उत्तर दिले आहे. शाहरुख म्हणाला, “भाई, एवढ्या पैशात ओटीटीचे सब्स्क्रिप्शनपण नाही मिळत आणि तुला संपूर्ण चित्रपट हवा आहे.” शाहरुखचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

हेही वाचा- Video : “शेवटी त्यांची लायकी…,” करीना कपूरची चाहतीशी वर्तणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप

शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून ‘जवान’ ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना शाहरुखच्या या नव्या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे. ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपतीदेखील दिसणार आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.

Story img Loader