शाहरुख खानची लाडकी लेक सुहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत ती ब्रेकअप केल्याचं म्हणत आहे. त्यामुळे सुहाना नेमकं कुणाला डेट करत होती, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. खरं तर सुहानाचं बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालेलं नाही, तिचा हा व्हिडीओ नवीन जाहिरातीचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखची लेक सुहानाने तिच्या साबणाशी ब्रेकअप केलं आहे. सुहाना ‘लक्स’ची नवी ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. शाहरुख लक्सचा ब्रँड ॲम्बेसेडर बनल्यानंतर सुमारे १९ वर्षांनी आणि त्याची मुलगी सुहाना ब्रँडची ॲम्बेसेडर बनली आहे. तिची ‘लक्स’ची पहिली जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे. यात ‘मी ब्रेकअप केलंय, माझ्या साबणाशी’ असं ती म्हणते. मग ती लक्सच्या नवीन बॉडीवॉशची जाहिरात करते.

मे महिन्यात सुपरहिट चित्रपट अन् बहुप्रतिक्षीत वेब सीरिज OTT वर पाहता येणार, वाचा कलाकृतींची यादी

सुहानाची ही जाहिरात एक्सवर सोनी नावाच्या एका युजरने शेअर केली आहे. या जाहिरातीवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना जाहिरातीत सुहानाचा अभिनय आवडला आहे, तर काहींनी मात्र तिला तिच्या हिंदी उच्चारावरून ट्रोल केलं आहे. वैयक्तिक आयुष्यात हे स्टार्स इंग्रजीत बोलतात आणि जाहिराती मात्र हिंदीत करतात, असं म्हटलं आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

सुहाना खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केलं. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात अगस्त्य नंदा, सुहाना खान, वेदांग रैना, खुशी कपूर हे स्टारकिड्स होते, पण या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता लवकरच सुहाना वडील शाहरुख खानबरोबर एकाच चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan daughter suhana khan break up announcement video hrc