बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सुहाना तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनेकदा तिचे पार्टीतील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सुहानाचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुहाना व शनाया कपूर यांना सुपरमॉडेल केंन्डल जेनरच्या एका पार्टीदरम्यान स्पॉट करण्यात आलं. या पार्टीतील त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहानाने या पार्टीसाठी डीप नेक शॉर्ट ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. याचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. परंतु, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सुहानाला तिच्या लूकवरुन ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’बाबत अजय देवगणचं विधान, म्हणाला “कोणताही चित्रपट…”

सुहानाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “क्लीन शेव केलेला शाहरुख खान”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत “श्रीमंती आणि प्रसिद्धीमुळे हे सर्व करत आहे”, असं म्हटलं आहे. “जरा ओव्हर नाही वाटत का?”, असंही एकाने म्हटलं आहे. अनेकांनी सुहानाच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची तुलना मिया खलिफाशी केली आहे.

हेही वाचा>> “घर घेऊन देण्याचं वचन दिलेलं”, नोरा फतेहीच्या आरोपांवर सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा, म्हणाला “तिने माझ्याकडून…”

दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकलेल्या या चित्रपटाने अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई केली आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.