बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणून अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तो त्याच्या कुटुंबाबरोबर वांद्र्यातील मन्नत या बंगल्यात राहतो. ज्याची किंमती काही कोटी रुपये आहे. त्याबरोबरच शाहरुखच्या लाइफस्टाइलचीही कायम चर्चा होताना दिसते. त्याचे महागडे कपडे, घड्याळ, शूज आणि गाड्या पाहून सगळेच अवाक् होतात. नुकतंच शाहरुख खानने त्याच्याकडे असलेल्या गाड्यांबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान हा सध्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर शाहरुखने Ask Srk सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्याला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. ‘तुझी सर्वात आवडती गाडी कोणती? आणि अशी कोणती गाडी आहे जी तू कधीही विकणार नाही?’ असा प्रश्न एका चाहत्याने त्याला विचारला.
आणखी वाचा : “मला काढून टाकावं…” सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याबद्दल शाहरुख खानचे मोठे वक्तव्य

त्यावर शाहरुख खान म्हणाला, “खरंतर Hyundai गाडी सोडून माझ्याकडे कोणतीही चांगली गाडी नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमात किंवा सोशल मीडियावर माझ्याकडे लक्झरी गाड्या असल्याबद्दल छापून येणारे सर्व रिपोर्ट्स हे बोगस आहेत.”

आणखी वाचा : “आमच्या दोघांमध्ये भांडण…” अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले 

दरम्यान शाहरुख खानकडे अनेक महागड्या गाड्या आहेत, असे बोललं जातं. ई-टाईम्सने दिलेल्या वृ्त्तानुसार, शाहरुखकडे ‘phantom Drophead Coupe’, ‘Land Rover Range Rover Sport’ आणि ‘BMW i8’ या गाड्या आहेत. त्याबरोबरच ‘Toyota Land Cruiser’, ‘Mitsubishi Pajero’, ‘BMW 6-Series Convertible’, ‘Hyundai Santro’, ‘Creta’ या गाड्या असल्याचेही बोललं जातं. मात्र आता त्याने या अफवा असल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan deny bogus reports about his luxury car collection nrp