शाहरुख खान( Shah Rukh Khan) हा असा अभिनेता आहे, ज्याचा चाहतावर्ग सर्वदूर पसरलेला आहे. बॉलीवूडमध्ये किंग खान अशी ओळख असलेला हा अभिनेता सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता ‘रईस’ या चित्रपटातील सहकलाकराने शाहरुखबद्दल वक्तव्य केल्याने तो चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला अभिनेता?

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ चित्रपटात प्रमोद पाठकने गुजरातच्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून प्रमोद पाठकने शाहरुख खानबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. तो म्हणतो, “बऱ्याचदा असे होते की, शाहरुख खान सुपरस्टार असल्याने लोकांच्या मनावर एकप्रकारे दडपण असते. तो इतरांना घाबरवत असावा असे वाटते. पण, तो खूप साधा माणूस आहे. तो साकारत असलेल्या भूमिकेत तो सेटवर येतो. त्याचे फक्त कामावर लक्ष असते.”

पुढे बोलताना तो म्हणतो, “शाहरुखबरोबर काम करण्याची सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की, त्याने मला कधीच तो सुपरस्टार असल्याचे जाणवू दिले नाही. तो नेहमी मला विचारत असायचा, आता केलेला सीन चांगला आला आहे का, आवडला का?तो इतरांना त्याचे मत विचारायचा आणि त्याला काय वाटतं, तेही सांगायचा. त्याच्याबरोबर काम करणे सोपे आहे. त्याच्याकडे तो सुपरस्टार असण्याचा अहंकार अजिबात नाही. दोन पात्रे एकमेकांबरोबर काम करत असल्याचे त्याच्याबरोबर शूटिंग करताना वाटते.”

हेही वाचा: “घृणास्पद कृत्य घडत असताना ‘मला फोटो काढू द्या’ असं पीडितांनी म्हणायचं का?” पुराव्यांबद्दल ज्येष्ठ अभिनेत्रीचा सवाल

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्याच्याबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान देखील महत्वाच्या भूमिकेत अभिनय करताना दिसली होती. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ने केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. २०१७ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ६ वा हिंदी चित्रपट ठरला होता.

दरम्यान, याआधीदेखील अनेक कलाकारांनी शाहरुख खानचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. वैयक्तिक आयुष्यातदेखील तो लोकांशी प्रेमाने वागत असल्याचे अनेक कलाकारांनी म्हटले आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘जवान २’ आणि ‘लायन’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan didnt have any ego or star attitude says raees co actor pramod pathak nsp