बॉलिवूड किंग शाहरुख खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. शाहरुखबरोबर त्याची पत्नी गौरी खानही कायम चर्चेत असते. शाहरुख व गौरीकडे बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. शाहरुखचं गौरीवर किती प्रेम आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेक मुलाखती व कार्यक्रमांतून हे दिसून आलं आहे. अशाच एका मुलाखतीत गौरीने शाहरुख तिच्याबाबत पझेसिव्ह असल्याचं म्हटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरीने सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत शाहरुखबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा गौरीने केला होता. “शाहरुख सुरुवातीला माझ्याबाबतीत इतका पझेसिव्ह होता की तो आजारी आहे, असं मला वाटायचं. पांढऱ्या रंगाचे कपडे तो मला घालू द्यायचा नाही. ते ट्रान्सपरंट असल्याचं कारण त्याने मला दिलं होतं”, असं गौरीने सांगितलं होतं. याबरोबरच शाहरुख गुडघ्यांच्यावर असलेले कपडेही घालू देत नसल्याचा खुलासा गौरीने केला होता.

हेही वाचा>> Video: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये बजरंग दलचा हंगामा, रॅपरच्या गाण्यावर आक्षेप घेत कार्यक्रम केला रद्द

हेही वाचा>> “सेक्सी व्हिडीओ पाठव” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली “तुझ्या…”

शाहरुखनेही गौरीच्या या वक्तव्याला पुष्टी दिली होती. “मी गौरीबाबत खूपच पझेसिव्ह होतो. तिला कोणाबरोबर बोलताना बघितलं तरी मला वाईट वाटायचं. महिला असो किंवा पुरुष, आपल्या जोडीदाराबद्दल ही भावना प्रत्येकाच्या मनात असते”, असं शाहरुख म्हणाला होता. शाहरुखच्या या वागणुकीमुळे गौरीला मनस्ताप झाल्यामुळे तिने त्याच्याबरोबरचं नातं संपवून टाकलं होतं. परंतु, शाहरुखने गौरीची समजूत काढल्यानंतर पुन्हा ते दोघं एकत्र आले.

दरम्यान, चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘पठाण’नंतर शाहरुख ‘डंकी’ व ‘जवान’ या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan didnt not allowed gauri khan to wear short clothes kak