बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान नेहमी चर्चेत असतो. शाहरुखचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, ‘डॉन-३’ चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. डॉन चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा- ‘रावडी राठोड’ चित्रपटाबाबत सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “असले चित्रपट…”

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

‘प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट’चे सहभागीदार रितेश सिधवानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. रितेश म्हणाले, ‘जोपर्यंत माझा जोडीदार फरहान अख्तर डॉन-३ चित्रपटाचे स्क्रिप्ट लेखन पूर्ण करीत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या तो स्क्रिप्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, असेही रितेश सिधवानी म्हणाले.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी मिळून ‘एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस’ चालवतात. या दोन्ही निर्मात्यांनी मिळून १९७८ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. यानंतर २००६ साली डॉन चित्रपटाचा पहिला रिमेक प्रदर्शित झाला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. पाच वर्षांनंतर २०११ मध्ये डॉन-२ रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. हे दोन्ही चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते.

शाहरुखने डॉन ३ चित्रपटाला नकार दिला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भविष्यात तो या चित्रपटाला होकारही देऊ शकतो. तर शाहरुख खान बरोबर अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात एक भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच अमिताभ बच्चनही या चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात शाहरुख आपले डॉनचे टायटल रणवीर सिंगकडे सोपवणार आहे, जेणेकरून डॉनचे पुढील भाग रणवीर सिंगवर बनवता येतील. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा- “हा शेवटचा चित्रपट…” ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली “पुन्हा संधी मिळेल की नाही…”

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या नवीन चित्रपट ‘डंकी’मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी करीत आहेत. ‘डंकी’नंतर शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख ॲक्शन अवतारात दिसणार आहे. याआधी शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने जगभरात १०५० कोटींची कमाई केली आहे.

Story img Loader