बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने सिनेविश्वात त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आजवर त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्याने मिळवलेल्या यशामुळेच त्याला बॉलीवूडचा किंग खान, असंही म्हणतात. अशात आता शाहरुखपाठोपाठ त्याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खानसुद्धा मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण करू पाहत आहेत. आर्यनने दिग्दर्शक म्हणून आणि सुहानाने एक अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. अशात आपल्या दोन्ही मुलांबद्दल कौतुक करताना शाहरुखने चाहत्यांना एक विनंती केली आहे.

शाहरुख खान सोमवारी नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स कार्यक्रमात आला होता. मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पहिला कार्यक्रम ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या अनावरण सोहळ्यासाठी तो संपूर्ण कुटुंबासह येथे उपस्थित होता. या कार्यक्रमात शाहरुख त्याची पत्नी गौरी खान मुलगा आर्यन खान व मुलगी सुहाना खानबरोबर आला होता. येथे त्याने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच माझ्यावर या दुनियेनं जितकं प्रेम केलं त्यातील ५० टक्के प्रेम तरी माझ्या मुलांना द्यावं”, असं तो म्हणाला.

शाहरुखने मुलांसाठी केलेल्या विनंतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “माझा मुलगा जो दिग्दर्शनात त्याचं पहिलं पाऊल ठेवत आहे आणि माझी मुलगी जिनं अभिनयाला सुरुवात केली आहे. जनतेनं माझ्यावर जितकं प्रेम केलं त्यातील ५० टक्के प्रेम जरी या दोघांना दिलं तरी खूप झालं.”

कार्यक्रमात शाहरुख पुढे म्हणाला, “मी माझी मजेशीर माहिती बनवण्याची कला माझ्या मुलालाही दिली आहे. हा कार्यक्रम बनवण्यासाठी भाग घेतलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. सर्वांनी यात फार छान काम केलं आहे. मी याचे काही एपिसोडसुद्धा पाहिले आहेत.”

‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही एक बहुशैली असलेली सीरिज आहे. बाहेरच्या जगातील एक व्यक्ती जी बॉलीवूडच्या दुनियेत प्रवेश करते, त्यावर आधारित ही सीरिज बनवण्यात आली आहे. आर्यन खानने याचे दिग्दर्शन केले आहे आणि गौरी खानने रेड चिलीज एंटरटेन्मेंट अंतर्गत याची निर्मिती केली आहे.

कालच या कार्यक्रमाचा एक टीझर व्हिडीओ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये शाहरुख खानने आपल्या अनोख्या अंदाजात मुलाच्या पहिल्या कार्यक्रमाचं नाव जाहीर केलं. टीझरमध्ये शाहरूख शूटिंग करताना दिसत आहे. त्यामध्ये त्याला नाव जाहीर करण्याआधी सतत टेक घ्यावा लागतो. अनेक टेक घेतल्यावर शाहरुख म्हणतो, “तुझ्या वडिलांचं राज्य आहे का?” टीझरमध्ये पुढे आर्यन खान समोर येतो आणि हो, असं उत्तर देतो. त्यावर शाहरुख म्हणतो आता मी कसं बोलतो ते पाहा आणि यातून तुम्हीही शिका. “चित्रपट तर अनेक वर्षांपासून बाकी आहे; मात्र खरा शो आता सुरू होणार आहे…”, असं म्हणत शाहरुखने आपल्या मुलाच्या नेटफ्लिक्सवरील कार्यक्रमाचं द बॅड्स ऑफ बॉलीवूड हे नाव जाहीर केलं आहे.

Story img Loader