शाहरुख खानचा यंदाचा तिसरा आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘डंकी’ गुरुवारी (२१ डिसेंबर) रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग केली. चित्रपटाने ३० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाची सगळीकडे क्रेझ पाहायला मिळत आहे. याला सोलापूरही अपवाद राहिलेलं नाही. सोलापुरातही या चित्रपटाची क्रेझ असून प्रेक्षक व चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
सोलापूर शहरातील शाहरुख खानच्या फॅन्स क्लबने ‘डंकी’ सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. एसआरके फॅन्स क्लबने संपूर्ण थिएटर बुक करून चित्रपट पाहिला. इतकंच नाही तर सिनेमा पाहायला येताना त्यांनी गोरगरीब व भिक्षूंना दानही केले. शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याच्यासारखी वेशभूषा देखील केली होती.
डॉलर्सच्या देशात नेणारे जीवघेणे ‘डाँकी रूट्स’
एसआरके फॅन्स क्लबने शाहरुख खानच्या सिनेमाला संपूर्ण थिएटर बूक करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. जवळपास ५० ते ६० हजार रुपये खर्चून त्यांनी सर्वांसाठी थिएटर बूक केले आहे. सोलापूर शहरातील उमा मंदिर थिएटर समोर शाहरुखच्या चाहत्यांनी केक कापला, फटाके फोडले मोठ्या उत्साहात थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी रवाना झाले.