शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे लाखो चाहते उत्सुक असतात. वाढदिवस आणि ईद साजरी करण्यासाठी दरवर्षी किंग खान मन्नतबाहेर येतो. गेल्या अनेक वर्षांपासून घराच्या बाल्कनीत येऊन अभिनेता त्याच्या तमाम चाहत्यांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यंहादी शाहरुखने लेक अबरामसह मन्नतवरून त्याच्या सगळ्या चाहत्यांची भेट घेतली. शाहरुखला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.
संपूर्ण जगभरात आज ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. ईदनिमित्त बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान देखील दरवर्षी मन्नवरून चाहत्यांना अभिवादन करतो. किंग खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर करत जे चाहते आज मन्नतवर उपस्थित राहू शकले नाहीत अशा सगळ्यांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय गर्दी करणाऱ्या तमाम फॅन्सचे त्याने आभार मानले आहेत.
हेही वाचा : “बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या”, हेमंत ढोमेच्या फोटोवर पत्नी क्षितीची भन्नाट कमेंट; म्हणाली…
शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मन्नतबाहेर म्हणजेच संपूर्ण बॅण्डस्टॅण्डच्या परिसरात त्याच्या हजारो चाहत्यांनी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी किंग खानने हात उंचावून त्याच्या सगळ्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : शॉर्ट वनपीस अन्…; सायलीने अर्जुनसाठी बदलला लूक, ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो
शाहरुखबरोबर त्याचा लाडका लेक अबराम देखील उपस्थित होता. या व्हिडीओमध्ये अबरामदेखील सर्वांना शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शाहरुखने त्याचं स्टारडम एका वेगळ्या पद्धतीने जपलंय असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे.