बॉलीवूडचा बादशाह किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी गोष्टीसारखीच आहे. गौरी आणि शाहरुख बॉलीवूडमधलं लोकप्रिय कपल आहे. दोघांना आदर्श कपल मानलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी तरुण वयात भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. दोघंही दिल्लीमध्ये एका पार्टीत भेटले होते आणि त्यावेळेस ते पाच मिनिटांसाठी एकमेकांशी बोलले आणि नंतर शाहरुखला गौरीचा नंबर मिळाला. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी १९९१ रोजी लग्न केलं. आधी गौरीच्या आई-बाबांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं, कारण शाहरुख मुस्लीम होता. पण, शेवटी प्रेम जिंकलं आणि दोघंही आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार झाले.

हेही वाचा… “मै तेरी रानी, तू मेरो हुकूम को एक्का…”, पारू फेम शरयू आणि पूर्वाने केला पहाडी गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

आता शाहरुखची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ९० च्या दशकात ‘लेहरेन’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शाहरुख खानला विचारलं गेलं होतं की, तो त्याची पत्नी गौरीला घाबरतो का? या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला होता, “तुम्हाला ही गोष्टच माहीत नसू शकते, जर तुम्ही माझी पत्नी असता तरच तुम्हाला हे कळलं असतं. दोन जणांचं जे नातं असतं, मग ते पती-पत्नीचं असूदे किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड ते त्यांचं वैयक्तिक असतं. मग बाहेरचा कोणताही माणूस ते नातं समजूच शकणार नाही.”

शाहरुख पुढे म्हणाला, “जे नातं बेडरूममध्ये असतं (चार खोलींच्या आत असतं) ते नातं बाहेर कोणीचं समजू शकणार नाही. काही जण हा विचार करत असतील की मी घाबरतो, तर ठीक आहे त्यात मी खुश आहे. कोणाला वाटत असेल की मी तिच्यावर खूप प्रेम करतो; जे आमच्यामध्ये आहे ते फक्त आम्हालाच माहीत आहे, ते सांगूनपण लोकांना कळणार नाही. म्हणून जर कोणाला वाटत असेल मी माझ्या बायकोला घाबरतो तर…”

हेही वाचा… “माझं करिअर माझ्या बहिणीएवढं…”, काजोल आणि तनिषा मुखर्जीमध्ये होणाऱ्या तुलनेबद्दल स्पष्टच बोलली अभिनेत्री, म्हणाली…

दरम्यान, लग्नाच्या सहा वर्षांनंतर शाहरुख आणि गौरीने त्यांच्या मुलाचं म्हणजेच आर्यनचं स्वागत केलं. तसंच २००० मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी सुहानाचं आगमन झालं; तर २०१३ मध्ये हे जोडपं अबरामचे पालक झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan is afraid of his wife gauri said in an old interview dvr