बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं. दीपिका पदुकोणबरोबर शाहरुख रोमान्स करत असलेलं हे गाणं सध्या वादाच्या भोवर्यात अडकलेलं आहे. अशातच शाहरुखच्या दिग्दर्शकाने एक गुडन्यूज दिली आहे.
शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाबरोबरच ‘जवान’ चित्रपटातही चर्चेत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अटली कुमार व त्याची पत्नी प्रिया लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी कमेंट करत अटली व त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा >> …अन् मानसी नाईकच्या नवऱ्याला कॅमेऱ्यासमोरचं कोसळलं रडू, प्रदीप खरेराने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
“आमच्या कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे, हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे. तुमचं प्रेम व आशीर्वाद असेच राहू द्या” असं अटली व प्रियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अटली कुमार व प्रियाने ९ नोव्हेंबर २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर आठ वर्षांनी ते आई-बाबा होणार आहेत.
हेही वाचा >> “…तेव्हा मला आईने झाडूने मारलं होतं” प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ किस्सा
अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘पठाण’ प्रमाणेच शाहरुखच्या या चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेतही आहेत.