बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान सध्या त्याच्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज ७ सप्टेंबरला शाहरुखचा जवान चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्याने जवान चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर जवान चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. अभिनेता कमाल आर खानने नुकतंच ट्विटरवर ट्वीट करत जवान चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : इंडिया आणि भारत वादादरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय, आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

केआरकेने ट्विटरवर दोन ट्वीट केले आहेत. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्याने तो जवान चित्रपट पाहण्यासाठी आला आहे, याची माहिती दिली आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने मध्यांतरापर्यंत चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.

“मध्यांतर झाला आहे आणि आतापर्यंत जवान हा उत्तम चित्रपट आहे, असं मला वाटतंय. उत्तम अॅक्शन, उत्तम अभिनय, उत्तम कथा आणि उत्तम पार्श्वसंगीत. हा चित्रपट संपूर्ण मनोरंजन करतो. मी अशी आशा करतो की, दिग्दर्शक अ‍ॅटली दुसऱ्या भागातही हीच जादू कायम ठेवतील”, असे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : Jawan Review: खास दाक्षिणात्य तडका, शाहरुखचा हटके अंदाज व गंभीर समस्यांवर भाष्य; ‘जवान’ खरंच पैसा वसूल आहे का?

यानंतर केआरकेने संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर ट्वीट केले आहे. “जवान हा चित्रपट सध्याच्या व्यवस्थेवर आणि भ्रष्टाचारावर थेट हल्ला करतो. शाहरुखने दोन्ही पात्रे साकारताना जबरदस्त अभिनय केला आहे. दीपिका पदुकोण आणि नयनतारा यांनीही त्यांची पात्र उत्तम पद्धतीने साकारली आहेत. संजय दत्त या चित्रपटात चकित करतो आणि विजय सेतुपतीने खलनायक म्हणून फारच छान काम केले आहे. फारच उत्तम, प्रत्येकाने एकदा तरी पाहावा”, असे केआरकेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “पांढरे कपडे घालून खुर्चीवर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा स्टँप पेपर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीबद्दल मोठा खुलासा, म्हणाला “मी अब्दुल करीम तेलगीला…”

दरम्यान या चित्रपटात शाहरुख खान बरोबर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader