अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट दोन महिन्यांनी म्हणजेच ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १० जुलैला ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. साडेदहा वाजता रिलीज झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलर पाहून सध्या बॉलीवूडमधील कलाकार आणि किंग खानचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘जवान’च्या ट्रेलरला एका दिवसात चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सना सेटवर आमच्याबरोबर कधीच जेवली नाही, कारण…”, ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींनी केदार शिंदेंच्या लेकीचे केले कौतुक

‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरला फक्त २४ तासांमध्ये तब्बल ११२ मिलियन व्ह्यूज आल्याचे ट्वीट शाहरुखच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ केले आहे. यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाद्वारे शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. ‘पठाण’ चित्रपटापासूनच शाहरुखच्या ‘जवान’ची चर्चा सुरु झाली होती.

हेही वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने कसं कमी केलं वजन? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बरोबर ६ आठवड्यांनी…”

‘जवान’च्या २ मिनिट १२ सेकंदाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करेल असा अंदाज त्याच्या चाहत्यांनी आणि काही चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे. जवानच्या ( हिंदी, तमिळ, तेलगू) प्रीव्ह्यूने अवघ्या २४ तासांत ११२ मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठल्याचे, ट्वीट शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ने केले आहे. यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने, “हा चित्रपट सर्व रेकॉर्ड्स मोडणार” असे ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका युजरने, “आता सोशल मीडिया प्रमोशनशिवाय सगळीकडे ग्राऊंड प्रमोशन सुरु करा” अशी कमेंट केली आहे. यावरून किंग खानचे चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : कतरिना कैफसह २० वर्षे काम करणारी ‘ती’ व्यक्ती कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्यासाठी ते अनेकदा रडले…”

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुखसह नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकार सुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan jawan trailer crosses 112 million views in 24 hours sva 00