Kal Ho Na Ho Re Release : शाहरुख खानच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांमध्ये किंग खानच्या चित्रपटांबद्दलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक जुने आणि गाजलेले चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहेत. याच ट्रेंडला फॉलो करत शाहरुखचा ‘कल हो ना हो’ पुन:प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान, प्रीती झिंटा, आणि सैफ अली खान यांनी २००३ साली आलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. १५ नोव्हेंबर २०२४ हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गेल्या २१ वर्षात हा सिनेमा अनेकदा टीव्हीवर प्रसारित झाला. प्रेक्षकांनी हा सिनेमा अनेकदा पाहून सुद्धा ते हा चित्रपट पुन्हा बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून याचा प्रत्यय येत आहे. सध्याच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या स्पर्धेतही या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे.

हेही वाचा…विक्रांत मॅसीच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्याच्या सहकलाकाराने व्यक्त केली शंका, म्हणाला “हा तर पीआर…”

जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर लोक तो सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये येऊन पाहतील का याबाबत शंका असते. पण शाहरुख खानच्या चित्रपटांबाबत मात्र हे लॉजिक लागू होत नाही. दिग्दर्शक निखिल आडवाणी याचा ‘कल हो ना हो’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होऊन १५ दिवसांहून अधिक काळ झाला आहे. तरीही या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

१५ दिवसात ‘कल हो ना हो’ने केली ‘इतकी’ कमाई

२१ वर्षांपूर्वी आलेल्या ‘कल हो ना हो या चित्रपटातील ड्रामा आणि गाणी प्रेक्षकांना आजही भावत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. १७ दिवसांत या चित्रपटाने एकूण ५.६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पहिल्या आठवड्यात २.१० कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात २.२० कोटी रुपये, तर तिसऱ्या आठवड्यात १.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकड्यांकडे पाहता, ‘कल हो ना हो’ला अजूनही प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसते.

हेही वाचा…कडाक्याची थंडी, वैष्णोदेवीला पायी प्रवास अन्…; एका गाण्याच्या शूटिंगसाठी धर्मशाळेत राहिलेले सुपरस्टार राजेश खन्ना

शाहरुखची जादू कायम

यावर्षी शाहरुख खानचा एकही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी त्याच्या जुन्या चित्रपटांच्या री-रिलीजमुळे त्याचे चाहते त्याला मिस करताना दिसत नाहीत. यावर्षी शाहरुख खानचे ‘करण अर्जुन’, ‘कल हो ना हो’, आणि ‘वीर जारा’ हे तीन चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan kal ho na ho re release earns more than 5 crore in 17 days psg