बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात शाहरुख बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणसह रोमान्स करताना दिसत आहे. दीपिकाने गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान करुन रोमान्स केल्यामुळे या गाण्यावरुन वादंग उठलं आहे.

‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद सुरू असतानाचा शाहरुखने त्याच्या ट्विटरवर १७ नोव्हेंबरला “आस्क एसआरके” (AskSRK) हे सेशन ठेवलं होतं. या सेशनद्वारे त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न शाहरुखला विचारले. शाहरुख खान सध्या तीन चित्रपटांची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पठाणबरोबरच त्याचे जवान व डंकी हे चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शाहरुखला त्याच्या चाहत्याने प्रश्न विचारला.

हेही वाचा>>Video: करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाशने दुबईत खरेदी केलं घर; स्विमिंगपूल, आलिशान बेडरुम अन्…; व्हिडीओत दिसली झलक

“तुझी मुलं कोणता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पठाण, जवान की डंकी?” , असा प्रश्न चाहत्याने #AskSRK सेशनमध्ये शाहरुखला विचारला. शाहरुखने चाहत्याच्या या प्रश्नाला ट्विटरवर उत्तर दिलं आहे. “आम्ही सगळेच सध्या अवतार २ पाहण्यासाठी उस्तुक आहोत”, असा रिप्लाय शाहरुखने चाहत्याला दिला आहे.

हेही वाचा>>“…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

srk pathan

हेही वाचा>> हिरवा चुडा, मंगळसूत्र अन् टिकली; अक्षयाच्या “मिसेस जोशी” फोटोने वेधलं लक्ष

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader