शाहरुख खान(Shah Rukh Khan)ने ‘दिवाना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अभिनेत्याने ‘दिल है हिंदूस्तानी’, ‘बाहशाह’, ‘कुछ कुछ होता है’, ‘रामजाने’, ‘परदेस’, ‘दुल्हा मिल गया’ ते नुकतेच प्रदर्शित झालेले ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही शाहरुख विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता तो लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका कार्यक्रमात त्याच्या या आगामी चित्रपटाबद्दल, तसेच ‘पठाण’ चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने त्याला काय ताकीद दिली होती याबद्दल वक्तव्य केले आहे.

किंग खान काय म्हणाला?

शाहरुख खानने नुकतीच दुबईच्या ग्लोबल व्हिलेजमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्याने डान्स सादर केला, तसेच चाहत्यांशी संवाददेखील साधला. शाहरुखने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी बोलताना म्हटले, “मी फक्त इथे शूटिंग करत नाही, तर मुंबईतही शूटिंग करतोय. माझा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद कडक शिस्तीचा आहे. त्याने ‘पठाण’ चित्रपट बनवला आहे. त्याने मला ताकीद दिली आहे की, लोकांना चित्रपटाबद्दल काही सांगू नको. चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांगू नकोस, त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. पण, हा चित्रपट तुमचे भरपूर मनोरंजन करेल हे खात्रीने सांगू शकतो. तुम्हाला मजा येईल”, असे म्हणत शाहरुखने चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल खात्री दिली आहे. पुढे गमतीने शाहरुख खानने म्हटले, “आतापर्यंत मला अनेक टायटल मिळाली आहेत. सध्या आपल्याकडील टायटल संपली आहेत. आता शाहरुख खान हा ‘किंग”मधील शाहरुख खान असे ओळखले जाईल.” पुढे त्याने थोडा शो ऑफ झाला, असेही म्हटले. ” वयासंबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “या वर्षी मी ६० वर्षांचा होईन, पण मी ३० वयाचा दिसतो.”

Torres Scam
Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
_sex parties at davos
सेक्स पार्टी अन् नऊ कोटींमध्ये मुलींची बुकिंग; दावोस परिषदेदरम्यानचा धक्कादायक अहवाल समोर, प्रकरण काय?
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Lata Mangeshkar refused to sit for 8 to 10 hours while recording Rang De Basanti song
लता मंगेशकरांनी ८-१० तास उभे राहून गायलेलं ‘हे’ गाणं, बसायला दिलेला नकार; दिग्दर्शकाने सांगितली आठवण
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई
Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा

याशिवाय अभिनेत्याने या कार्यक्रमात पुरुषांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे, असे म्हटले आहे. किंग खानने म्हटले, “जगभरातील सर्व पुरुषांनी महिलांना सन्मान द्या. ज्या महिला तुम्हाला भेटतात, त्यांचे ऐका. तुम्ही त्यांना समजून घ्यायला पाहिजे. ज्या महिला तुम्हाला भेटतात त्यांच्याप्रति तुम्ही आदर दाखवला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे.”

दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर त्याची मुलगी सुहाना खान व अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

Story img Loader