बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. अवघ्या महिनाभरातच या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशस्वी कामगिरीनंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’ चित्रपट बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही होत होती. परंतु, असं असतानाही चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. चौथ्या आठवड्यातही ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत ६२३ कोटींची तर जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा>> Video: नाईट सूटमध्ये नमाज केल्यामुळे राखी सावंत ट्रोल, नेटकरी म्हणाले “नेलपेंट लावून…”

‘पठाने’ चित्रपटाने वर्ल्ड वाइड १००० कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपटाची निर्मिती कंपनी असलेल्या ‘यशराज फिल्म्स’कडून ट्वीट करण्यात आलं आहे. “जगभरात ‘पठाण’ची १००० कोटींची कमाई” असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यशराज फिल्म्सचं हे ट्वीट स्वरा भास्करने रिट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून स्वराने ‘पठाण’च्या यशस्वी कामगिरीबद्दल टीमचं अभिनंदन केलं आहे. त्याबरोबरच बॉयकॉट गँगवरही स्वराने निशाणा साधला आहे.

हेही वाचा>> बॉलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

“बॉयकॉट गँग, हग्गा, बॉलिवूडच्या सिताऱ्यांना शुभेच्छा…” असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘पठाण’बाबत स्वराने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. दरम्यान, स्वरा भास्कर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. स्वराने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं आहे. काही दिवसांपूर्वीच स्वराने एक व्हिडीओ शेअर करत कोर्ट मॅरेज केल्याची माहिती दिली होती. स्वरा व फहाद मार्च महिन्यात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan pathaan crossed 1000cr world wide actress swara bhaskar congratulate kak