बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटींची विक्रमी कमाई केली. अवघ्या तीनच दिवसांत ‘पठाण’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद आणि यश पाहून दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद भारावून गेले आहेत. ‘पठाण’च्या यशाबद्दल सिद्धार्थ आनंद यांनी ‘हिंदूस्थान टाइम्स’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “इतिहास घडवावा असं प्रत्येकाला वाटतं, पण कोणीही त्याचं नियोजन करू शकत नाही. ते होऊन जातं. आणि जेव्हा असं होतं, तेव्हा तो अनुभव फारच छान असतो. मी फारच आनंदात आहे. आता सेटवर जाऊन प्रेक्षकांसाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन यावं, असं मला या क्षणी वाटतं आहे”.
हेही वाचा>> पठाण’ चित्रपटाबाबत अतुल कुलकर्णींचं ट्वीट; दीपिका पदुकोणचा भगव्या बिकिनीतील फोटो शेअर करत म्हणाले…
“पठाणसारखा भव्य चित्रपट बनवण्यासाठी मी उत्सुक होतो. माझ्यासाठी बॉक्स ऑफिसचे आकडे महत्त्वाचे आहेत. आमच्या कठीण परिश्रमांचं ते फळ आहे. पण यात संपूर्ण टीमचं योगदान आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला अनुभव आम्हाला प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून द्यायचा होता. आणि पठाणच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करू शकलो. चित्रपटाशी प्रेक्षकांना कनेक्ट होता आलं, तरच तो चित्रपट यशस्वी होतो. पठाणच्या बाबतीतही हेच होत आहे”, असंही पुढे सिद्धार्थ आनंद म्हणाले.
हेही वाचा>> साखरपुडा झाल्यानंतर अनंत अंबानी-राधिका मर्चंटसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, व्हिडीओ व्हायरल
‘पठाण’च्या माध्यमातून शाहरुख खान तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर झळकला. त्यामुळे या चित्रपटासाठी त्याचे चाहतेही आतुर होते. या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.