बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तीवर २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे यावर या चित्रपटाची कथा आहे. ८०चं दशक गाजवणाऱ्या राजकुमार संतोषींच्या हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकलेला नाही
मीडिया रिपोर्टनुसार, ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी ८० लाख रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ ३४ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे दोन दिवसांत ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त एक कोटी १४ लाख रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
हेही वाचा>> ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, सिद्धार्थ आनंद म्हणाले “माझ्यासाठी आकडे…”
हेही वाचा>> आधी साखरपुडा अन् लगेचच दुसऱ्या दिवशी पार पडलं लग्न; ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याची नवी इनिंग
२५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने अवघ्या तीनच दिवसांत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५४ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७० कोटींचा गल्ला जमवत दोनच दिवसांत १२७ कोटींची कमाई ‘पठाण’ने केली. तिसऱ्या दिवशीही ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरू आहे. या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई तिसऱ्या दिवशी केली आहे.
हेही वाचा>> ‘पठाण’ चित्रपटाबाबत अतुल कुलकर्णींचं ट्वीट; दीपिका पदुकोणचा भगव्या बिकिनीतील फोटो शेअर करत म्हणाले…
‘पठाण’ चित्रपटाचा फटका ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ चित्रपटाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे.