बहुप्रतिक्षित व बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे चित्रपटाला विरोध होत होता. ‘बेशरम रंग’ गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत दीपिका पदुकोण व शाहरुख खानने रोमान्स केल्यामुळे हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. हिंदू संघटना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून या चित्रपटाला जोरदार विरोध होत होता. भगव्या बिकिनीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’ चित्रपटाविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंदौरमध्ये हिंदू संघटनेकडून शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला जोरदार विरोध दर्शविला जात आहे. ‘पठाण’ चित्रपटाचा इंदौरमधील ‘सपना संगीता टॉकीज’ या चित्रपटगृहातील सकाळी ९:०० वाजताचा शो हिंदू संघटनेकडून बंद पाडण्यात आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ झाला लीक! यशराज फिल्म्स ट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा>> “मिया खलिफा…”, पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सुहाना खान ट्रोल

‘ऑनलाईन इंदोरी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हिंदू संघटनेचे कार्यकर्ते घोषणाही देताना दिसत आहेत. दरम्यान, याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’बाबत अजय देवगणचं विधान, म्हणाला “कोणताही चित्रपट…”

शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगमधून २४ कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ची संपूर्ण देशभरात क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan pathaan movie show shut down by hindu sangatana protester in indore watch video kak