बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २२ दिवसांतच या चित्रपटाने देशांतर्गत ५०० कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाइड ९७० कोटींचा टप्पा गाठला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पठाण’च्या यशानंतर निर्मिती कंपनी ‘यशराज फिल्म्स’कडून चाहत्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. येत्या शुक्रवारी ‘पठाण दिवस’ सेलिब्रेट करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.त्यामुळे पठाण चित्रपटाच्या तिकिटाचे दर कमी करण्यात येणार आहेत. संपूर्ण भारतात १७ फेब्रुवारीला पठाण चित्रपटाचं तिकिट ११० रुपयांत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा>> Video: आदिल खानच्या अटकेनंतर गर्लफ्रेंड तनु चंडेल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, राखी सावंतबाबत विचारताच म्हणाली…

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच शिव ठाकरेचं एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबाबत वक्तव्य, म्हणाला “प्रेम हे…”

“पठाण डे येतोय! पठाणने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. येत्या शुक्रवारी आमच्याबरोबर पठाणचं यश सेलिब्रेट करुया. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपॉलिस आणि भारतातील इतर चित्रपटगृहांमध्ये फक्त ११० रुपयांत तुमचं तिकिट बुक करा”, असं यशराज फिल्म्सकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण जॉन अब्राहम या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच ५७ कोटींची कमाई केली होती. आत्तापर्यंत शाहरुखच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.