बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तब्बल तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटांपैकी ‘पठाण’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. परंतु, चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याच्या सिक्वेलची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

बहुचर्चित ‘पठाण’ या अक्शनपट असलेल्या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याची माहिती आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पठाण’ चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा याबद्दल विचार करत आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये नवीन पात्रही दिसणार आहेत. ‘पठाण’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी स्क्रिप्ट तयार करण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर’ चित्रपटाच्या सिक्वेलप्रमाणेच ‘पठाण’च्या पुढच्या भागांचे शूटिंग वेगवेगळ्या देशात करण्यात येणार आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

हेही वाचा >> ‘हाऊसफुल ५’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार, रितेशसह चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची फौज

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान ‘पठाण’मध्ये तर शाहरुख ‘टायगर ३’मध्ये कैमिओ करताना दिसणार आहेत. सलमानने चित्रपटातील त्याचं शूटिंग पूर्णही केलं आहे. परंतु, शाहरुखने अद्याप ‘टायगर ३’च्या शूटिंगला सुरुवात केलेली नाही.

हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘पठाण’बरोबर त्याचा ‘जवान’ चित्रपटही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान तीन वर्षांनंतर चित्रपटांची मेजवानी घेऊन येत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झीरो’ चित्रपटात तो दिसला होता.

Story img Loader