शाहरुख खान जगातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. चाहते शाहरुखच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखने आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ज्यामध्ये फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासह १४ फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. मात्र, एकेकाळी हा पुरस्कार जिंकण्यासाठी शाहरुखने लाच देण्याचाही प्रयत्न केला होता. एका मुलाखतीत याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा- माधूरी दीक्षितचे नाव ऐकताच ‘या’ पाच अभिनेत्रींनी ‘दिल तो पागल है’ला दिलेला नकार; धक धक गर्लची वाटत होती भीती?

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Shah Rukh Khan Emotional On Swades Act
Video : लेकाच्या शाळेत २० वर्षांपूर्वीचं ‘ते’ एव्हरग्रीन गाणं ऐकून भावुक झाला शाहरुख खान! व्हिडीओ व्हायरल
Bollywood actor Shahrukh khan wear 63000rd Hermes necklace at son abram school annual function
Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क
Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर
Sameer Wankhede on Aryan Khan case calls Shah Rukh Jawan dialogues cheap
“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

शाहरुख खानने रजत शर्माच्या शोमध्ये याचा खुलासा केला होता. शाहरुख म्हणाला “जेव्हा माणसाला काही मिळवण्याची इच्छा असते तेव्हा त्या गोष्टीसाठी तो वाईट होतो. काहींना बंगला, गाडी हवी असते. मलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळण्याची उत्सुकता होती. मी पुरस्कार मिळवण्यासाठी उतावीळ झालो होतो कारण मला वाटले की मी त्यासाठी पात्र आहे. या इच्छेपायी मी चुकीच्या मार्गावर गेलो.”

शाहरुख पुढे म्हणाला, “मी एकदा संपादकाकडे गेलो आणि म्हणालो मला हा पुरस्कार हवा आहे आणि तुम्हाला पैसे हवे असतील तर मी तेही द्यायला तयार आहे. पण त्यांनी मला सांगितले की असे काही चालत नाही, तुम्ही जर चांगले असाल तर लोक तुम्हाला मत देतील.” शाहरुखला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला पण तो पैशामुळे नव्हे तर सार्वजनिक मतदानाने होता. पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुखने मंचावर संपादकाची माफीही मागितली होती.

हेही वाचा- “मासिक पाळीच्या तारखा विचारल्या” अमृता सुभाषने सांगितला ‘सेक्रेड गेम्स’मध्ये इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव, म्हणाली…

शाहरुखच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती दिसणार आहेत. यानंतर तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader