दिव्या भारती ही बॉलीवूडमधील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपला वेगळा ठसा उमटवला होता. दिव्याने तिच्या करिअरमध्ये शाहरुख खानबरोबरही चित्रपट केले होते. तिची आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना जास्त भावली. मात्र, ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्याचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळेस दिव्या केवळ १९ वर्षांची होती. दिव्याचा मृत्यू बॉलिवूडसाठी दु:खद घटना होती. दिव्याच्या मृत्यूची बातमी ऐकूण शाहरुखलाही मोठा धक्का बसला होता. दिव्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर काय परिस्थिती होती याबाबत एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले आहे.
दिव्या शाहरुखला अभिनेता नाही तर संस्था समजायची
एनडीटीव्हीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीदरम्यान शाहरुख खान म्हणाला होता, “माझ्या मते दिव्या भारती एक अभिनेत्री म्हणून अप्रतिम होती, ती एका अभिनेत्याच्या अगदी विरुद्ध होती, जसा मी स्वतःला एक गंभीर प्रकारची समजत होतो. मात्र, ती एक पूर्णपणे मजेदार प्रेमळ मुलगी होती. मला आठवते की मी सी रॉक हॉटेलमध्ये ‘दिवाना’ चित्रपटासाठी डबिंग करत होतो. डबिंग केल्यानंतर मी बाहेर पडलो तेव्हा समोर दिव्या होती. मी दिव्याला हाय म्हणालो. तेव्हा दिव्या माझ्याकडे बघून म्हणाली, ‘तू’ फक्त एक अभिनेता नाहीस, तू एक संस्था आहेस.’ मी तिच्यावर खूप प्रभावित झालो. मी म्हणालो व्वा. मला ते समजले नाही आणि पटकन जाऊन त्याचा अर्थ वाचला तेव्हा कळाले की याचा खूप मोठा अर्थ आहे.
शाहरुखला दिव्याच्या मृत्यूची माहिती कशी मिळाली?
दिव्याच्या मृत्यूबाबत शाहरुख म्हणाला, “मी तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. मी दिल्लीत झोपलो होतो आणि ते माझं गाणं ‘ऐसी दिवानगी’ वाजवत होते. मला वाटलं की मी मोठा स्टार झालोय. मला मोठा स्टार कसं व्हायचा हेच कळत नव्हतं. हा चित्रपट खूप मोठा होता. अचानक ही गाणी वाजू लागली आणि मला सकाळी जाग आली. त्यानंतर मला दिव्याच्या मृत्यूची बातमी कळाली. ती खिडकीतून पडली होती. हा सर्वात मोठा धक्का होता कारण मला तिच्याबरोबर दुसरा चित्रपट करायचा होता “