बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा सध्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आला आहे. या ट्रेलरला अवघ्या २४ तासांत ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘जवान’चा दमदार ट्रेलर पाहून आता शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढली आहे. अलीकडेच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीनं शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. विजयच्या याच ट्विटला शाहरुखनं प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
शाहरुखनं विजय सेतुपतीच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “तुमच्याबरोबर काम करणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मला तमिळ शिकवणं आणि स्वादिष्ट जेवण दिल्याबद्दल धन्यवाद.” शाहरुखनं आपल्या शैलीत विजयला ही प्रतिक्रिया देऊन पुन्हा एकदा नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
हेही वाचा – टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम सुपरस्टारवरही; अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला, “आता खाण्याबाबत….”
शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम भाषांमध्ये हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच विजय सेतुपती खलनायक म्हणून दिसणार आहे. याशिवाय दीपिका पादुकोण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात ‘त्या’ दोघांचीही कामगिरी महत्त्वाची; केदार शिंदेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
या चित्रपटानंतर शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटामुळे पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान एकत्र काम करत आहेत.