शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना शाहरुखने चाहत्यांसाठी एक खास भेट दिली आहे.

हेही वाचा- ‘गदर २’ची ५०० कोटी क्लबमध्ये थाटात एन्ट्री; ‘या’ दोन चित्रपटांना टाकलं मागे

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”

रविवारी शाहरुखने सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतले. या सेशलमध्ये त्याने चाहत्यांना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. यामध्ये एका चाहत्याने शाहरुखला कमेंट करत प्रश्न विचारला होता की, मी माझ्या पत्नीसोबत हाँगकाँगमध्ये जवानचे आगाऊ तिकीट बुक केले. आम्ही खूप उत्साही आहोत. कृपया रिलीजपूर्वी आम्हाला स्पॉयलर द्या?” यावर किंग खानने खुलासा केला की, “कृपया सुरुवात चुकवू नका, वेळेवर पोहोचा.” दरम्यान किंग खानने आपल्या धाकटा मुलगा अबरामला ‘जवान’मधील कोणते गाणे आवडते हे देखील सांगितले. अभिनेत्याने खुलासा केला की, “यामध्ये एक सुंदर अंगाईगीत आहे. नाहीतर माझे आवडते चलैया आहे.

या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- “फ्लॉप चित्रपटांमुळे टार्गेट केलं”, अमीषा पटेलने बॉलीवूडबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर असता तर…”

‘जवान’ हा शाहरुखचा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे. जवाननंतर, तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी प्रदर्शित झालेला ‘पठाण’ हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा शाहरुखच्या ‘जवान’वर खिळल्या आहेत.

Story img Loader