बॉलिवूडच्या अनेक कलाकारांबरोबरच त्यांची मुलंही कायमच चर्चेत असतात. हे कलाकार अद्याप मनोरंजन क्षेत्रात आलेले नाही. तरीही त्यांच्या फॉलोअर्समध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. यातीलच एक म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या दरम्यान शाहरुख खानच्या मुलाखतीमधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खानची लेक सुहाना ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती लवकर द आर्चीज या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यात तिच्याबरोबर खुशी कपूर, अगस्त्य नंदाही स्क्रीन शेअर करणार आहे. सुहाना खानबरोबरच आर्यन खान चित्रपटात कधी दिसणार असा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो. काही वर्षांपूर्वी शाहरुखने स्वत: या प्रश्नाचे उत्तर दिले होते.
आणखी वाचा : Video : प्रियांका चोप्रा-रणवीरचा डान्स पाहून शाहरुख खानच्या पत्नीने केलं असं काही…; व्हिडीओ व्हायरल

सध्या शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खान हा आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलत आहे. या मुलाखतीत शाहरुख खानला आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले.

“माझा मुलगा आर्यन याला अभिनेता बनायचे नाही आणि मलाही वाटत नाही की तो अभिनेता बनू शकेल. आपल्या देशात अभिनेत्याचा मुलगा हा अभिनेता बनतो, असे अनेकदा होते. आर्यन हा दिसायला चांगला आहे. उंच आणि देखणाही आहे. पण तरीही तो एक चांगला अभिनेता बनू शकत नाही, हे त्याच्याही लक्षात आले आहे. पण तो एक उत्तम लेखक नक्कीच होऊ शकतो”, असे शाहरुखने या मुलाखतीत म्हटले होते.

आणखी वाचा : “तू सराव कर आणि व्हॉईस…” अमृता फडणवीसांना आशा भोसलेंनी दिला सल्ला

दरम्यान आर्यन खानने परदेशातून फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. लवकरच तो एका लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान ही झोया अख्तरच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सुहानाने अभिनय क्षेत्रात करियर करायचं निश्चित केलं आहे. लवकरच तिचा ‘द आर्चीज’ हा चित्रपच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan revealed shocking reason says my son aryan handsome but not become actor nrp