शाहरुख खान आणि गौरी खान यांनी एकमेकांबरोबरचा ३३ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे, ज्यात त्यांनी आर्यन, सुहाना आणि अबराम या तीन मुलांचं संगोपन केलं आहे. परंतु, मुलं होण्यापूर्वी शाहरुखने कधीही कल्पना केली नव्हती की गौरी एक चांगली आई ठरेल. करण जोहरने शाहरुख खानला कॉफी विथ करण शोमध्ये मुलं झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले हे विचारले होते.
शाहरुखने याच मुलाखतीत सांगितले होते की , “मला आश्चर्य वाटतं, पण मी कधी विचार केला नव्हता की गौरी एक चांगली आई बनेल. ती मुलांसाठी उत्सुक असणारी स्त्री वाटत नव्हती, म्हणजेच मुलं आवडणारी मुलगी कशी असते, तशी ती नव्हती. पण जेव्हा ती एक उत्तम आई ठरली, तेव्हा मला सुखद धक्का बसला. माझासारखा बाप असल्यास मुलांना तिच्यासारखीच आई हवी. कारण ती याबाबतीत सर्व गोष्टी अगदी सोप्या करते”
शाहरुख आणि गौरीला १९९७ पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले. १९९८ मध्ये रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले की, तो आर्यनच्या जन्मावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये होता आणि त्याला गौरीबद्दल खूप भीती वाटत होती. “मी गौरीबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो होतो आणि मला वाटलं की ती मरून जाईल. त्यावेळी मला मुलाबद्दल विचारसुद्धा नव्हता. ती खूप थरथर करत होती, आणि मला माहिती होतं की मूल जन्मताना मरण्याची शक्यता नाही, पण तरीही मी थोडा घाबरलो होतो,” असं त्याने सांगितलं.
आर्यनचं नाव का ठेवलं याबद्दल शाहरुखने सांगितले, “मला वाटलं जेव्हा एखाद्या मुलीला तो सांगेल की माझं नाव आर्यन आहे, आर्यन खान, तर ती खूप इम्प्रेस होईल.” आर्यन त्याच्या (शाहरुख)आणि गौरी सारखा दिसतो, असंही त्याने सांगितलं. “त्याच्यात माझ्या काही हावभाव आहेत असं मला वाटतं. शाहरुखने याच मुलाखतीत त्याने मुलाचे डायपर बदलले नसल्याचंही नमूद केलं होत.
हेही वाचा…“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलां
शाहरुखचा मुलगा आर्यन लवकरच ‘स्टारडम’ हा शो घेऊन येत आहे, ज्यात तो शो रनरची भूमिका बजावत आहे. त्याची मुलगी सुहाना २०२३ मध्ये ‘द आर्चिज’ चित्रपटात पदार्पण करताना दिसली, आणि ती आता सुजॉय घोषच्या ‘किंग’ चित्रपटात शाहरुखबरोबर झळकणार आहे.