अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. १ ते ३ मार्च दरम्यान अंबानी कुटुंबीयांनी जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला बॉलीवूड, राजकीय ते क्रिकेट विश्वापर्यंतचे सगळे मान्यवर उपस्थित होते. सोहळा संपल्यावर सगळे सेलिब्रिटी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु, ६ मार्चला संध्याकाळी शाहरुख, सलमान खानसह इतर बॉलीवूड स्टार्स पुन्हा एकदा जामनगरला गेल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडचे हे बडे कलाकार पुन्हा एकदा जामनगरला गेल्याने अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा अद्याप समारोप झालेला नाही हे समोर आलेलं आहे. ६ मार्चला ( बुधवारी ) संध्याकाळी शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, ओरी, शिखर पहारिया, अरिजित सिंह व त्याची पत्नी यांच्याशिवाय इतर बॉलीवूड सेलिब्रिटी जामनगर विमानतळावर दिसले. हे सगळेजण अंबानी कुटुंबीयांच्या म्युझिकल इव्हेंटसाठी पुन्हा एकदा प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम खास रिलायन्स कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केला होता.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’वर सुरू होणार दोन नव्या मालिका, प्रोमो आले समोर…

शाहरुख खान मंचावर येताच प्री-वेडिंगमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. अंबानी कुटुंबीयांनी किंग खानचं घरगुती सदस्याप्रमाणे स्वागत केलं. याशिवाय सलमान त्याच्या जुन्या गाण्यांवर तर, रणवीर सिंह “मल्हारी…” या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं. याचे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : जान्हवी कपूर बॉयफ्रेंड अन् ओरीसह तिरुपतीच्या दर्शनाला, शिखर पहारियाचं महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

दरम्यान, शाहरुख खानने या कार्यक्रमात उपस्थितांशी गुजरातीमध्ये संवाद साधला. मोहब्बतें चित्रपटातील डायलॉग किंग खानने गुजरातीमध्ये रिक्रिएट केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan salman ranveer singh and others return to entertain jamnagar at ambani party bash sva 00