अबुधाबी येथे पार पडलेल्या २०२४ च्या आयफा पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करीत शाहरुख खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विकी कौशल आणि करण जोहरदेखील त्याला साथ देताना दिसले. या पुरस्कार सोहळ्यात करण जोहर आणि शाहरुख खानने लोकांना भरपूर हसवल्याचे पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय म्हणाला शाहरुख खान?
शाहरुख खानने करण जोहरचे स्टेजवर, “भारतातील अनेक मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक”, असे म्हणत स्वागत केले. स्टेजवर येताच करण जोहरने शाहरुख खानला मिठी मारली. त्याने असे करताच शाहरुखने त्याला, “असे सार्वजनिकरीत्या इतके प्रेम दाखवू नकोस, लोक यावर काहीतरी बोलतील”, असे मस्करी करीत म्हटले. त्यावर प्रेक्षकांनी हसून प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
शाहरुखने याआधी आयफा पुरस्कार सोहळ्याचे होस्टिंग केले होते. त्या घटनेला दशक उलटले आहे. त्याबाबत करण जोहरने शाहरुखला विचारले, “तुझ्या गैरहजेरीत मी कसं होस्टिंग केलं होतं? त्यावर शाहरुखनं विनोदी पद्धतीनं उत्तर देत म्हटलं, “ज्या प्रकारे एखाद्या मोठ्या बिल्डिंगचा मालक जेव्हा दूर असतो, तेव्हा त्याचा वॉचमन त्या बिल्डिंगची काळजी घेतो. त्याच पद्धतीनं तू होस्टिंग केलं आहेस.”
याच संवादादरम्यान, शाहरुखने म्हटले, “सुनील छेत्री, सचिन तेंडुलकर, रॉजर फेडरर या दिग्गज खेळाडूंनी योग्य वेळेत रिटायरमेंट घेतली असे म्हटले जाते.” त्याच वेळी करणनं त्याला विचारलं की, तूदेखील दिग्गज आहेस, तू का रिटायरमेंटचा विचार करीत नाहीस? त्यावर उत्तर देत शाहरुख खानने म्हटले, “या बाबतीत मी धोनीसारखा आहे. नाही नाही म्हणत आम्ही १० आयपीएल खेळतो.”
त्यावर विकी कौशलने म्हटले, “दिग्गज लोक रिटायर होत असतात; पण राजे कायम राहतात”, असे म्हटले.
दरम्यान, आयफा पुरस्कार सोहळ्यातील शाहरुख खान टेलिप्रॉम्पटरचा वापर करीत सूत्रसंचालन करीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी टेलिप्रॉम्पटरचा वापर करणं ही फार मोठी गोष्ट नाही, असे म्हणत किंग खानचे समर्थन केले आहे.
शाहरुख लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानदेखील असणार आहे.