बॉलीवूडचा किंग शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच शाहरुखचा डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटातील पहिले गाणे ‘लुट पुट गया’ प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याअगोदर शाहरुखचे जवान आणि पठाण चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यामुळे आता चाहते डंकीची आतुरतेने वाट बघत आहे.
दरम्यान नुकतंच शाहरुखने एक्स (पूर्वीच ट्वीटर)वर आस्क एसआरके सेशन घेतलं. या सेशनमध्ये शाहरुखने चाहत्यांच्या अनेक भन्नाट प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली. यामध्ये एका चाहत्याने शाहरुखला विचारले होते की, विना टिकीट डंकी चित्रपट कसा बघू शकतो? चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं आहे. शाहरुखने म्हणाला “जेव्हा मी छोटा होतो तेव्हा मी प्रोजेक्शनिस्ट पटवायचे आणि चित्रपट बघायचो. हा पर्याय तू वापरु शकतोस कदाचित कामाला येईल.” शाहरुखच्या या उत्तराने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला डंकी चित्रपट थिएटरमध्ये न दाखवता चित्रपटगृहांमध्ये दाखवण्याची विनंती केली होती. यावर शाहरुख म्हणालेला, होय, मी टीमलाही सांगितलं पण एअर कंडिशनिंगची समस्या आहे. हा चित्रपट बघण्याासाठी तुम्हाला लहान मुलं आणि मोठ्या माणसांना घेऊन जावं लागले. एसी नसेल तर अनकंफर्टेबल होईल. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करुया.
शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख, तापसी व्यतिरिक्त विक्की कौशलची मुख्य भूमिका आहे. शाहरुखच्या अगोदरच्या चित्रपटांची कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.