अभिनेता शाहरुख खानला लॉस एंजेलिसमध्ये शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त काल व्हायरल झालं होत. शाहरुखच्या नाकाला ही दुखापत झाली होती. तसेच त्याच्या नाकाची सर्जरी झाल्याचं बोललं जात होतं. यामुळे शाहरुखचे चाहते चिंतेत होते. मात्र अशातच चाहत्यांना दिलासा देणारा शाहरुखचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. ज्यामध्ये प्रकृती चांगली असल्याचं दिसत आहे. माहितीनुसार, शाहरुखच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे आता तो मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेण्यासाठी परतला आहे.
शाहरुखचा मुंबई विमानतळावरचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राम ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेज शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत शाहरुखची प्रकृती चांगली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याच्या नाकावर कोणतीही जखम झाल्याचं दिसत नाही. यावेळी शाहरुखनं निळ स्वेटशर्ट, निळ डेनिम आणि काळी टोपी घातली होती. यादरम्यान, शाहरुखची पत्नी गौरी खान आणि छोटा मुलगा अबराम खान विमानतळाच्या पार्किंग परिसरात हातात हात घालून चालना दिसले होते. व्हिडीओत गौरी निळ्या रंगाच्या मिडी ड्रेस आणि ब्लेजरमध्ये दिसत आहे. तर आर्यन कॅज्युअल कपड्यांमध्ये आहे.
हेही वाचा – “महाराष्ट्राचं राजकारण पण फिकं…”, उर्फी जावेदचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले…
शाहरुखच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं की, “तो आता बरा दिसत आहे. यासाठी मी देवाचे आभार मानतो. आता मला चांगली झोप लागेल.” तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, “याचा अर्थ शाहरुख जखमी झाल्याची वृत्त खोट होतं.”
ई टाईम्सनं काल दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखला लॉस एंजेलिसमध्ये शूटिंगदरम्यान त्याच्या नाकाला दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किरकोळ सर्जरी करण्यात आली. तसेच काळजी करण्यासारखं काहीही नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होत. पण शाहरुखच्या निकटवर्तीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या नाकावर फक्त किरकोळ दुखापत झाली होती. आता तो मुंबईला विश्रांती घेण्यासाठी परतला आहे.
हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या कोण आहे तो?
दरम्यान, शाहरुखचे दोन चित्रपट ‘जवान’ आणि ‘डंकी’ सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ‘जवान’ चित्रपट सप्टेंबर २०२३मध्ये तर ‘डंकी’ चित्रपट डिसेंबर २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे.